आमच्याबद्दल

‘स्ट्रॅटेजी कन्सल्टन्ट्स’च्या माध्यमातून आम्ही राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातील प्रश्नांवर उत्तरं शोधण्याचं काम करतो. विशेषतः, राजकारणासारख्या क्षेत्रात प्रतिमा बांधणी आणि संवर्धन, लोकांशी नाळ जोडणं, सौहार्दाची जपणूक, समाजमाध्यमांवरील वावर आणि तळागाळातील जनतेची नस ओळखणं अशी आव्हानात्मक कामं होणं नितांत आवश्यक असतं. या क्षेत्रातील सर्व प्रश्नांचं एकमेव उत्तर आम्ही आहोत, असं नम्रपणे आम्ही सांगू इच्छितो.

‘स्ट्रॅटेजी कन्सल्टंट्स’ हा केवळ आपापल्या क्षेत्रांत प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींचा समूह नसून ते सौहार्द आणि परस्पर सहकार्याच्या भावनेने भारलेली, आदर्शांच्या पायावर उभारलेली आणि मूल्यांची जपणूक करत यशाची कास धरलेली एक प्रतिष्ठीत संस्था आहे. अनेक तरूण पत्रकार, राजकीय कार्यकर्ते, विचारवंत, संशोधक आणि राजकीय विश्लेषक आमच्याशी जोडले गेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानं आम्ही करत असलेल्या कामांच्या यशस्वितेमध्ये कायमच मौलिक भूमिका बजावली आहे. यातूनच आमचं कार्य दीपस्तंभासारखं बनलं आहे, जे समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींचा अन्वयार्थ लावून समोर आलेल्या प्रश्नांवर चपखल उत्तरं शोधण्यास सहाय्यभूत ठरतं.

तर मग करायची सुरुवात?

तुमच्या सामाजिक आणि राजकीय कामाचा श्रीगणेशा करण्यासाठी "आज"पेक्षा चांगला मुहूर्त कोणताच नाही. आमच्याशी संपर्क साधा आणि मग होऊ दे तुमच्या जिंकण्याची सुरुवात.